Wednesday, September 23, 2009

The Prestige---

काहींना मैत्री आणि त्यातून निर्माण होणारे शत्रुत्व म्हणजेच ड्रामा ह्या genre चे चित्रपट आवडतात,काहींना Sci -Fi आवडतात,तर काहींना रहस्यपट आवडतात.पण जर या तीन गोष्टींना एकत्र केले आणि त्याला सगळ्यांची मांडणी जादुबरोबर केली तर? तर तयार होतो ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'The Prestige '.

बऱ्याच गोष्टी एकाच वेळी घडत असल्या मुळे प्रेक्षकाची तारांबळ नक्कीच उडते.पण जर व्यवस्थित समजला तर 'The Prestige' तुम्हाला नक्कीच फारआवडेल.




प्रत्येक महान 'Magic trick' चे तीन भाग असतात.पहिला भाग 'The Pledge',यात जादुगार काहीतरी साधी वस्तू दाखवतो उदा.पत्ते,पक्षी,माणूस वैगेरे.दुसरा भाग असतो 'The Turn' यात जादुगार सामान्यातून काहीतरी असामान्य करून दाखवतो.आता तुम्ही त्यातली गोम शोधायचा प्रयत्न करता........मात्र ती सापडत नाही,कारण तुम्ही तिथे नीट बघत नाही.कारण तुम्हाला ती शोधायचीच नसते,तुम्हाला वेडं बनायचं असत.तरीसुद्धा तुम्ही अजून टाळ्या वाजवणार नाही,कारण एकदा गायब केलेली पुन्हा परत आणायची असते.ह्यामुळेच सगळ्यात महत्वाचा आणि अवघड भाग असतो तो म्हणजे 'The Prestige"

ह्या नोट वर सुरु होणारा 'The Prestige' सुरुवातीपासूनच पुढे काय होईल याची हुरहूर लावतो.मैत्री आणि त्यातून निर्माण होणारे शत्रुत्व ह्यावरचे अनेक चित्रपट सर्वांनी बघितले असणारच याची मला खात्री आहे.पण ह्या विषयामध्ये The Prestige' इतपत सरस चित्रपट मी अजून पाहिलेला नाही(अजून चांगला कोणता असेल तर कृपया कळवा).
चित्रपट सुरु होतो तो आल्फ्रेड बोर्डन (Christian Bale)च्या पकडल्या जाण्याने.Robert Angier(Huge Jackman) चा द रिअल ट्रान्सपोर्टेद man चा खेळ सुरु असताना आल्फ्रेड स्टेज खाली जातो,आणि त्याला पाण्याच्या box मध्ये मरणारा रोबेर्ट दिसतो,सगळा आळ आल्फ्रेड वर येतो.जेल मध्ये बंद असलेला आल्फ्रेडला ओवेन नामक solicitor आपल्या सगळ्या ट्रीक 'लॉर्ड कॅद्लोव' ला वीक आणि ते तुझ्या मुलीचा भविष्यकाळ उज्वल करतील असे सांगतो.जाता जाता तो Angier ची डायरी आल्फ्रेड जा देऊन जातो.तेथून सुरु होतो Angier चा प्रवास.त्याच कॉलोराडो स्प्रिंग्स मध्ये येणं,टेसला ने त्याच्या मित्र साठी बनवलेली मशीन वैगेरे, पुढे काय होणार याची उत्सुकता लावतात,तेवढ्यात चित्रपट flashback मध्ये जातो.


एक जादुगार,प्रेक्षकांमध्ये प्लॉट केलेले आल्फ्रेड आणि Angier,शो गर्ल म्हणून काम करणारी Angier ची पत्नी जुलिया(Piper Perabo) आणि काही विपरीत घडले तर त्यासाठी कटर(Michael Caine) अशा सगळ्या पात्रांची माहिती नोलान एकाच दृश्यात देऊन टाकतो.जादूचा खेळ सुरु असताना Cutter ने सांगून सुद्धा चुकून आल्फ्रेड कडून चुकीची गाठ बांधली जाते आणि त्यामुळे जुलिया चा प्राण जातो.या सगळ्यात Angier आल्फ्रेडला जवाबदार ठरवतो आणि दोघांमध्ये वैर निर्माण होते.आल्फ्रेड आपली पत्नी सारा(Rebecca Hall) च्या सल्ल्याने आपला स्वतःचे जादूचे प्रयोग सुरु करतो,गर्दी खेचण्यासाठी तो जीवघेणी अशी बंदुकीची trick सुरु करतो,त्यात खेळात angier आपला बदला घेतो आणि आल्फ्रेड ची बोटे कापली जातात.निराश Angier कटरच्या मदतीने जादूचे प्रयोग सुरु करतो,ह्या वेळेस आल्फ्रेड आपला बदला घेतो,आणि Angier चे प्रयोग बंद पडतात.पुढे आल्फ्रेड 'the transported man' चा शो सुरु करतो आणि अमाप प्रसिद्धी कमावतो.तीच आईडिया Angier वापरतो आणि आल्फ्रेड मुळे आपला पाय मोडून घेतो.आल्फ्रेड चे सिक्रेट शोधण्या साठी angier ओलीविया(Scarlett Johansson)ला आल्फ्रेडच्या शो मध्ये भाग घेण्यास पाठवतो.
टेसलाच्या मशीनने clones तयार होतात हे angier ला कळत आणि तो त्यांच्या मदतीने 'The real transported man' ची रचना करतो.
.नंतरचा चित्रपट अतिशय सुंदर आणि क्लिष्ट आहे त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्येकानेच तो बघावा असं मला वाटतं.


आल्फ्रेड आणि ओलीविया च नातं,टेसलाची मशीन,FALLON आणि सर्वात महत्वाचा शेवट या सर्व गोष्टी आणि त्यांची मांडणी अप्रतिम आहे.Christian Bale आणि Huge Jackman ह्या दोघांचे काम पाहाण्याजोगे आहे.मात्र Michael Caine आणि Christian Bale चं संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन जातात असं म्हण्यास हरकत नाही ; पण म्हणजे असं नाही कि Huge Jackman चं काम खराब आहे.पण वैयक्तिकरित्या मला त्या दोघांचे काम फार आवडले.






शेवटी
मात्र महत्वाचं असं जोनाथन नोलान आणि ख्रिस्तोफर नोलान यांनी लिहिलेली कथा, ख्रिस्तोफर नोलानचं दिग्दर्शन चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं; आणि त्यामुळेच हा चित्रपट जादूच्या तिसऱ्या भागाप्रमाणे 'The Prestige'मध्ये अचूक आणि अविस्मरणीय ठरतो.


-----
अनिकेत सुरगुडे

Monday, September 14, 2009

रीअर वींडो--सुंदरतेचा अव्वल नमूना

Director&Producer:Sir Alfred Hitchcock
Based on the short story"It Had To Be Murder" by Cornell Woolrich

Cast:
L.B.Jefferies :-James Stewart
Lisa Freemont :-Grace Kelly
Stella :-Thelma Ritter
Lars Thorwald :- Raymond Burr
Det.Lt.Thomas Doyle:-Wendell Corey

Music :-Franz Waxman


'It Takes Only One Witness To Spoil the Perfect Crime'

रीअर वींडो हा जरी Hitchcock च ट्रेडमार्क असला जरी त्यात त्यानी त्यांची हुकूमत असलेल्या गूढ़,प्रेमकथा,त्यातले तणाव हे हुकुमी एक्के म्हणुन दाखवले असले तरी देखील हा त्यांचा one of the most well crafted आणी सुंदररीत्या दाखवलेला पीकचर आहे . त्यामुलेच रीअर वींडो जींकुन जातो.
संपूर्ण पीकचर मध्ये आपण केवल एकाच खीडकीतुन सगल बघतो.म्हणजेच Hithcock आपल्याला फ़क्त नायकाच्या दृष्टीकोनातुनाच संपूर्ण cinema बघायाला भाग पडतो.


एका रातरी बरेच जेवण आणी वाईन पील्या नंतर तो नेहमी प्रमाणे खीडकी बाहेर बघत बसतो,त्याला ऐकू येते एका बाईची किन्चाली आणी समोरच्या खोलीतला मनुष्य आपली बैग घेउन रात्रीच्या वेली ३ वेला बाहेर जातो आणी परत घरी येतो,जेफ ते सगल बघतो आणी सुरु होते तर्क आणी वीतर्क ह्यांचा खेळ !!!!!!!!!

L.B.Jefferies (James Stewart) हा जरा अती उत्साही फोटोग्राफर रेसींग ट्रैक वर फोटो काढताना आपला पाय आणी कंबर fracture करून घेतो.घरातल्या खीडकीतुन दुसर्यांच्या आयुष्यात डोकावने हाच त्याचा सध्याचा टाइमपास.त्याची अतीशय बडबडी आणी सतत जेफ़ला advice आणी टोमणे मारणारी nurse stella(Thelma Ritter) ही प्रतेक वेळी त्याला त्याच्या खीडकीतुन बाहेर बघण्याच्या सवयीमुले तो संकटात सापडेल ह्याची जाणीव करून देते.Hitchcock पुढे जेफ़ वर येणार्या संकटांची जाणीव इथून करून देतो.त्याची मैतरीन Lisa Freemont(Grace kelly)ही जेफ़ला बायको म्हणुन नको आहे पण त्याचे तिच्या पुढे काहीच चालत नाही.कथा पुढे जाते लीसाने आणलेले जेवण केल्या नंतर दोघांचे बरेच भांदन होते.जेफ़ नेहमी प्रेमाने खीडकी बाहेर बघत राहतो पण आज त्याला एका बाईची कींचाली ऐकू येते.समोरच्या अपार्टमेंट मधला भाडेकरू Lars Thorwald(Raymond Burr)जो सेल्समन आहे तो आपली कामासाठी वापर्नारी बैग घेउन पावसात मध्यरातरी आपल्या घरातून तीन वेला बाहेर जातो आणी तीन वेला परत येतो.जेफ़ हे stella ला सांगतो आणी त्याने आपल्या बायकोचा खून केला असावा असा तर्क लावतो.पुढे तो हेच लीसाला सांगतो आणी दोघे गुन्हेगार म्हणुन Lars Thorwald कड़े बघू लागतात.यातच दुसर्या भाड़ेकरूचा कुत्रा Thorwald च्या बागेत जमीन उकरताना जेफ़ बघतो आणी त्याचा संशय अजुन बलकट
होतो.यामधे जेफ़ आपल्या detective मीतराची मदत घेण्याचे ठरवतो.हा Detective Thomas J. Doyle (Wendell Corey)जेफ़ची बरीच मदत करतो मात्र ते Thorwald ला खुनी सीद्ध करू शकत नाही.नीराश जालेले जेफ़ आणी लीसा त्याला नाद सोडून देतात पण अचानक त्याच रातरी दुसर्या भाड़ेकरूचा कुत्रा मरतो.आणी इथून चित्रपताला वेगलीच कलातानी मीलते.शेवटी Thorwald खर्च खुनी आहे की नाही हे बघण्यासाठी पीकचरच बघावा.

रीअर वींडो मधली Stella म्हणते "We've become a race of Peeping Toms" हे सध्या अगदीच खर आहे.अतीशय सुंदर संभाषण ह्या पीकचर मध्ये दखावान्यत आली आहेत.जेफ़ आणी लीसा ची शाब्दीक जुगलबंदी अतीशय सुंदर वाटते.कैमरा वर्क अतीशय मस्त असल्यामुळे कीतीही वेला हां पीकचर पाहीला तरी कंताला येत नाही.Hitchcock च प्रसिद्ध maggufin technic (ह्या पीकचर मध्ये 'wedding ring' हे होय) वेग्लीच मजा आणते.

अखेरीस Alfred Hitchcock ने ह्या पीकचर मध्ये संपूर्ण पणे बाजी मारली आहे.जगातल्या सर्वोतकृष्ट १० पीकचर मध्ये नक्कीच 'रीअर वींडो' चा नेहमीच उल्लेख होइल हे नक्कीच.

----
अनीकेत सुरगुडे