Sunday, May 16, 2010

शेरलॉकची इमेज बदलणारा होल्म्स



शेरलॉक होल्म्स असा प्रायव्हेट डिटेक्टिव जो सर्वांच्या मनावर राज्य करतो.किंबहुना तो आजवरचा लिहिला गेलेला सर्वोत्तम डिटेक्टिव.त्याच व्यक्तिमत्व,विद्वत्ता आणि तेवढच म्हत्वाच म्हणजे डॉ.वॉटसन आणि २२१ B ;आणि ह्या सगळ्याच श्रेय केवळ एका व्यक्तीला ती म्हणजे सर आर्थर कॉनन डॉयल.सर डॉयलांच्या ह्या असामान्य होल्म्सने मालिका,चित्रपट अशा माध्यमांतून नेहमी कमाल केली.ह्या सगळ्यात मोठा वाटा होता तो म्हणजे होल्म्स रंगवलेल्या अभिनेत्याचा.काहींना तो जमला तर काहींना नाही,मात्र प्रत्येकाने आपआपल्या परीने होल्म्सला पुर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न नेहमीच केला.ह्यात सर्वात यशस्वी ठरला तो म्हणजे ग्रेंडाच्या मालिकांमधला जेरेमी ब्रेट.त्याने उभा केलेला होल्म्स तंतोतंत सर डॉयलांच्या होल्म्सला मिळणारा होता.त्याने आपली एक वेगळीच छाप लोकांच्या मनात उभी केली.त्याच्यापेक्षा उत्तम होल्म्स उभा करणे शक्य नाही यात अजिबात वाद नाही.मात्र ब्रेटच्याच ताकदीचा होल्म्स एका कलंदराने रंगवून दाखवला.तो कलंदर म्हणजे रॉबर्ट डाऊनी ज्युनियर.डाऊनीचा होल्म्स आणि ब्रेटचा होल्म्स यात म्हणटलं तर बराच फ़रक आहे आणि नाही सुद्धा.

तसं कोणत्याही डिटेक्टिव सिनेमाच कथानक फ़ारस काही वेगळ नसत.एक अतिशय विद्वान डिटेक्टिव,त्याचा आयुष्यात तस फ़ारस काही बरं चाललेलं नसणं,पुढे त्याच्याच तोडीचा शत्रू त्याला मिळणं,त्याचे जग हादरवणारे प्लॆन्स आणि हिरोच त्याला थांबवण.अशा वेळी विलक्षण महत्व प्राप्त होत ते सिनेमाच्या सादरीकरणाला.तसच कथानक गतीमान ठेवण देखील तेवढच महत्वाच ठरत.अशावेळी सगळी जबाबदारी येउन पडते ती दिग्दर्शकावर आणि लेखकावर,आणि त्यांच्या ह्या क्षमतेवरच सिनेमाची क्षमता आणि यश अवलंबून असत.पण तरी देखील काही सिनेमे यात कमी पडुन देखील फ़ार वेगळ्या उंचीवर जातात आणि त्याला कारणीभूत असतो तो अभिनेत्यांचा अभिनय.गाय रिचीच्या होल्म्सची अशीच काहीशी गंमत आहे.

कथा सुरु होते ती लॉर्ड ब्लेकवूडच्या(मार्क स्ट्रोंग) पकडल्या जाण्याने.काळ्या जादूचा वापर आणि खुनांच्या आरोपाखाली त्याला फ़ाशीची शिक्षा सुनावण्यात येते.मरण्याआधी तो होल्म्सला भेटण्याची मागणी करतो.’पुढे घडणारया घटना तुझ्या आवाक्याबाहेर असणार आहेत तेव्हा तयार रहा असं तो होल्म्सला सांगतो.फ़ाशीनंतर तो मेल्याची वॉटसन(ज्युड लों)स्वतः खात्री करतो.यशस्वी केसचा आनंद तसच वॉटसनच केसेस मधून तसच २२१B मधून बाहेर पडण्याच्या विचाराने वैतागलेल्या होल्म्सची डोकेदुखी आयरीन एडलर(रेचेल मेकेडम्स) आपल्या रहस्यमयी वागण्याने वाढवते.तसच ती कोण्या रेओर्डन() ची केस देउन वाढवते.इकडे अचानक ब्लेकवूड जिवंत होऊन पळून गेल्याची बातमी होल्म्स आणि वॉटसनला मिळते.ब्लेकवूडच्या थडग्यात रेओर्डनच शव सापडत,आणि सुरु होतो तो ब्लेक्वूडला शोधण्याचा प्रवास.रहस्यमय आयरीन एडलर,ब्लेकवूडची जगाला हादरवणारी योजना आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे पुढच्या भागासाठी केलेली रचना यासाठी होल्म्स बघावाच.

पटकथेला जर व्यवस्थित फ़्लो मिळाला नाही तर सिनेमातल्या पटकथेतल्या चुका लगेच जाणवतात.होल्म्समध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते.आता ह्या साठी घेतलेले ५ लेखक जेवढे कारणीभूत आहेत तेवढाच कारणीभूत आहे तो म्हणजे गाय रिची.पण तरी देखील रिचीच कौतूक एवढ्यासाठीच की त्याने बदलेली होल्म्सची इमेज.जर त्याने शांत होल्म्स दाखवला असता तर सिनेमाची डोक्युमेंट्री व्हायला वेळ लागला नसता.अभिनयतर सगळ्यांच जुळून आलाय.रॉबर्ट डाऊनी आणि जुड लोची केमिस्ट्रीतर अगदी धमाल आहे.बाकी हेन्स झिमरच संगीत एकही बीट सोडत नाही,तसच १८व्या शतकातल लंडन अतिशय सुंदर उभारलय.सिनेमाच सर्वस्व दडलय ते रॉबर्ट डाऊनी ज्युनियरमध्ये.कोणताही सिनेमा अभिनयाने देखिल सुंदर बनवता येतो हे त्याने सिद्ध केलय,त्यामुळेच त्याला मिळालेल गोल्डन ग्लोब अतिशय सार्थ आहे अस म्हणण्यात हरकत नाही.शेवटी शेरलॉक होल्म्समध्ये कमी पडलेला रिचीने पुढील भागात कहर करावा अशी फ़ार ईच्छा आहे आणी तस जरी नाही झाल तरी पुन्हा एकदा चित्रपट उत्कृष्ट बनवायला रॉबर्ट डाऊनी असेनच.