Sunday, March 7, 2010

सिरियल किलर्सच्या गूढ साम्राज्यात - डिस्टन्झसिरियल किलर्स, रहस्यमयी,राक्षसी,अमानवी आणि गडद व्यक्तिमत्वाचे.त्यांच्याविषयी एका वेगळ्याच प्रकारची भीती मनात असते.किंबहुना त्यांची कृत्यच एवढी भयंकर आणि निर्घुण असतात कि अशी भीती वाटणं साहजिकच आहे.पण असं कितीही असलं तरी हे सिरियल किलर्स आपल्याला आवडून जातात,अगदी डझनभर माणसं मारली तरीसुद्दा.ह्याचं एक कारण म्हणजे "प्रत्येकातच एक सिरियल किलर दडलेला असतो." विधान धाडसी असलं तरीसुद्धा त्यात तथ्य नक्किच आहे.कारण प्रत्येकातच एक विचित्र प्रकारची विकॄती लपलेली असते,ती केवळ बाहेर पडायचा अवकाश असतो.सिरियल किलर्सच्या बाबतीत हिच त्यांची विकॄती अशक्य थराला जाते,आणि छळातून अथवा खुनातून त्यांना स्वर्गानंद मिळतो.आता त्यांच्या ह्या अवस्थेला बरयाच गोष्टी अवलंबून असतात.मनावर झालेला आघात,बदला,इर्षा अशा अनेक गोष्टी असू शकतात.त्यांनी मारलेली लोकं ही त्यांच्या ओळखीची असलीच पाहीजेत असं त्यांचा आग्रह नक्किच नसतो.काही सिरियल किलर्स हे बदला किंवा तत्सम गोष्टी लक्षात घेवून हत्या करतात तर काहींना कोणताही माणूस चालतो;फ़क्त छळ किंवा हत्या करणं आणि त्यातून आनंद मिळवणं एवढचं त्यांचं उद्दिष्ट.थोमस सिबेनच्या डिस्टन्ज आहे तो असाच काहीसा.

डिस्टन्झची कथा आहे ती अजिबात भयंकर नसलेल्या डॆनिअल बोअरची(केन ड्य़ुकेन) कारण मुळातच त्याला छळवाद मान्य नाही.त्याची चूक एवढीच की त्याला व्यसन लागलय,खून करायच;नाहीतर तो साधा सफ़ाई कामगार आहे एका बोटॆनिकल गार्डनचा.गार्डन साफ़ करणे,कचरयाची विल्हेवाट लावणे एवढचं त्याच काम.जेव्हा तो हजेरी लावण्यासाठी ओफ़िस मध्ये येतो तेव्हा त्याला लाईन देणारी जेना(फ़्रान्झिस्का वीझ)कडे बघणं आणि निघून जाणं एवढीच त्याची लव्हलाईफ़.त्याच घरदेखील धडं नाहीये,घरात एक फोटो नाही किंवा ते व्यवस्थित फ़र्निश्डही नाही.ह्यासगळ्यातून तो बिचारा किती एकटा आहे याची जाणीव सिबेन परोपरीने करुन देतो.तो एकटा आहे,शांत आहे,पण त्याच मन विचित्र प्रकारच्या वादळाने अस्वस्थ आहे,आणि त्यावर उपाय देखील त्याला सापडत नाहीये .एके रात्री तो पूलावरुन खाली एक दगड सोडतो,अक्सिडेंट झाल्याचा आवाज येतो,मात्र तो शांतपणे तिथून निघून जातो.रेडिओवर जेव्हा तो हि बातमी ऐकतो तेव्हा एका वेगळच समाधान त्याला लाभलयं हे लगेच कळून येत.पण हि फ़क्त सुरुवात आहे,कारण त्याला कोणत्या गोष्टींमधून आपली अस्वथता समाधानात बदलायची हे कळलय.तो उतावळेपणाने शिकारयांची बंदूक चोरतो आणि शांतपणे बागेत दोन ंमाणसांना मारतो.मात्र कुठेतरी आपण चुकतोय याची जाणीव त्याला होते,आणि तो जेनाबरोबर स्थायिक होतो.पण शेवटी व्यसन ते व्यसनच ज्याप्रमाणे दारुचा पहिला घोट घेण्याआधी त्याचा विचार करायचा असतो तसचं काही डेनिअलबद्दल घडतय.तो पुढचा खुन करण्यासाठी आतूर झालाय.हे होतानाच पोलिसांचा संशय डॆनिअलवर आलाय,एव्हाना ते त्याच्या घरीसुद्धा पोहोचले आहेत,मात्र जेना व्यवस्थितपणे पोलिसांची दिशाभूल करते.ह्या जेनाबद्दल ह्या वळणावर संशय नक्किच निर्माण होतो पण तेवढ्यात ती डॆनिअलला कनव्हिन्स करते आणि बंदूक शोधून काढते.शांतपणे हि बंदूक नदीत फ़ेकुन देण्यासाठी दोघेही निघतात;पण हा शेवट असूच शकत नाही कारण,शेवटी त्याने जी कर्म केली आहेत त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी.आणि ती मिळते.शेवटाबद्दल इतकच की "माणूस आपली व्रुत्ती बदलू शकतो,प्रव्रुत्ती नाही".

सिरियल किलर्सवरल्या सिनेमांमध्ये जर त्या सिरियल किलरला थोडीफ़ार जरी सहानभूती मिळाली नाही तरी तो चित्रपट अपूर्ण वाटतो.पण डिस्टनझ बद्दल तस नाही,तो नक्किच सहानभूती मिळवतो. जास्तीत जास्त स्टिल कॆमेरा आणि संगीताचा कमी पण व्यवस्थित वापर चित्रपटाला बांधून ठेवतात.सिबेनचा पहिलाच सिनेमा असला तरीसूद्धा त्यात तांत्रिक चूकांना वाव नाहिये.शेवटी डेनिअल हा अतिशय साधा,शांत खूनी आहे आणि त्याला शेवटी तेच मिळतं जे तो डिसर्व्ह करतो,बहुतेक हेच सिबेनला दाखवायच असेल.

4 comments:

 1. ह्म्म...इंट्रेस्टींग आहे...

  ReplyDelete
 2. होय नक्कीच,आणि आपला ब्लॉग वाचल्यानंतर तर नक्कीच सांगेन की आपण तरी जरूर बघावात.

  ReplyDelete
 3. हा सिनेमा नेटवर मिळत नाहीये.. ;-(

  ReplyDelete
 4. हा मी फेस्टिवलला बघितला होता.मी सुद्धा तो शोधण्याचा प्रयत्न करतोय काही दिवसांपूर्वी Rapidshare च्या लिंक मिळाल्याहोत्या मात्र त्या सापडत नाहीयेत आता.Let 's wait for some more time!

  ReplyDelete