Wednesday, February 9, 2011

सिनेमॅटीक परफ़ेक्शन आणि सिक्रेट इन देअर आईज्


सिक्रेट इन देअर आईज् मध्ये एका दृष्यात रिकार्डो बेंजामिनला म्हणतो,"यु सेड लाईफ़".वरवर हि एक अतिशय सामान्य ओळ आहे,पण त्याच्यासाठी नाही ज्याने सिक्रेट बघितलाय.त्यातली आर्तता आणि त्याची व्याप्ती त्यालाच कळेल ज्याने सिक्रेट बघितलाय.दिग्दर्शक जुआन जोस कँप्बेलाच्या ह्या सिनेमाने ऑस्कर जिंकुन जवळपास सर्वांनाच आश्चर्यचकित केल.हेन्केच्या ’व्हाईट रिबन’ आणि"प्रोफ़ेट’सारख्या तुफ़ान सिनेमांना डावलून सिक्रेटला पुरस्कार मिळेल ह्याची अपेक्षादेखील फ़ार थोडयांना असेल.पण खरं पाहता सिक्रेटचा हा बहुमान अतिशय योग्य होता,कारण थोडाफ़ार का होईना पण सिक्रेट त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वरचढ होता.बलात्कारासारख्या भीषण कृत्यावर असूनसुद्धा त्यात रिबनसारखा भडकपणा नव्हता,प्रोफ़ेटपेक्षादेखील सुंदर वातावरण निर्मिती आणि अप्रतिम प्रेमकथेची मांडणी त्यात होती.तसच सिक्रेटची असणारी पॉलिटिकल पार्श्वभुमी ह्यामूळे सिक्रेट अँकॅडेमीची एक अतिशय निर्धोक पसंती होती अस म्हणण्यास हरकत नाही.पण व्यवस्थित विचार केला तर ह्या तिघांची तुलना करण अतिशय चुकीच आहे.रिबनचा स्वतःचा एक वेगळा रंग होता,प्रोफ़ेटची एक वेगळी गाठ होती आणि सिक्रेटची चव काही निराळीच होती आणि त्यातली गुंतागुंत अतिशय मस्त जुळून आली होती.

सिक्रेटची कथा आहे ती बेंजामिन एस्पोशितो(रिकार्डो डॅरिन) ह्या रिटायर्ड लीगल कौन्सेलरची.२५ वर्षांपुर्वी लिलियाना कोलोटोवर(कार्ला क्युवेडो)घडलेल्या भीषण बलात्काराच्या आणि खुनाच्या केसवर त्याला पुस्तक लिहायचंय.त्याच्या आयुष्यात लिलियानाच्या केसचं विलक्षण महत्व आहे.त्याच संपूर्ण आयुष्य बदलणारी आणि त्याला अनेक गोष्टी शिकवणारी हि केस आहे.त्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तो त्याच्या त्यावेळेसच्या बॉस असणारय़ा आयरीन हेस्टिंग्झ(सोल्डाद विलामिल)ला भेटतो.आयरीनवर बेंजामिनच मनापासून प्रेम आहे,आणि आयरीनच बेंजामिनवर पण आजपर्यंत ते अव्यक्तच.त्यालाही हीच केस जबाबदार आहे.सुरुवातीवरच अडकलेल्या बेंजामिनला आयरीन "सगळ्या गोष्टी जिथून सुरु झाल्या तिथुन तुझ पुस्तक सुरु कर" अस सांगितल्या नंतर २५ वर्षांपूर्वी आयरीनचा ऑफिसातला पहिला दिवस आणि लव्ह ऍट फ़र्स्ट साईट पासून फ्लॅशबॅक किंबहुना बेंजामिनच्या पुस्तकाची सुरुवात होते.

एका सुंदर सकाळी नको असताना मिळालेल्या लिलियानाच्या केसमुळे बेंजामिन आणि त्याचा सहकारी पाबलो(गुलेर्मो फ्रान्केला) वैतागलेला आहे,तरीही तो घटनास्थळी पोहोचतो.घटनास्थळी पोहोचल्य़ावर लिलियानाचा मृतदेह पाहून डिपार्टमेंटला शिव्या घालणारा बेंजा निःशब्द होतो.त्याचे डोळेच त्याच्या मनातली घालमेल सांगून जातात.रिकार्डो मोरालेस(पाबलो रागो)ह्या लिलियानाच्या पतीला तो भेटतो आणि गुन्हेगाराला नक्की पकडू अस आश्वासन तो त्याला देतो.रिकार्डोची मदत घेऊन आणि लिलियानची आधीपासूनचे फ़ोटो बघून गोमेझ(झेवियर गोडिनो)हा लिलियानाचा जुना मित्र गुन्हेगार असावा असा त्याची शंका आहे.पूढे तो गोमेझला पकडतो आणि त्याला शिक्षा होते.मात्र काहीच दिवसांत गोमेझची सिक्रेट आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये नेमणुक केली जाते आणि तो सुटतो.आता हे गोमेझ प्रकरण चांगलच अंगावर आलय हे लक्षात घेऊन आयरीन बेंजामिनला ब्युएनो आयरेस सोडून जायला सांगते आणि तो दुर निघून जातो.पुस्तकाचा शेवट करण्यासाठी किंबहुना त्याच्यावर कोणताही आक्षेप नसावा यासाठी बेंजामिन रिकार्डोकडे जाण्याचे ठरवतो.तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय ह्याची बेंजामिनला खात्री आहे आणि त्यासाठी तो तिथेच थांबतो आणि अतिशय धक्कादायक शेवट समोर येतो.


चित्रपटाच्या शीर्षकात असलेल्या आईज् ह्या शब्दाला खरतर विलक्षण महत्व त्यातल्या पटकथेने आणि अभिनेत्यांच्या अभिनयाने मिळवून दिलय,डोळ्यांद्वारे व्यक्त होणारया एक्स्प्रेशन्सचा ह्यापेक्षा सुंदर वापर मी अद्याप बघितला नाही.त्यासाठी अभिनेत्यांचे खरच मनापासून कौतूक.सिनेमाची सिनेमेटोग्राफी सुद्धा उल्लेखनीय आहे.फ़ुटबॉल स्टेडियम मध्ये गोमेझला पकडण्याचा सीन अविश्वसनीय आहे;किंबहूना तेवढा सुंदररित्या शूट केलेला सीन आजपर्यंत पाहण्यात नाही.आजवर बघितलेल्या सर्वोत्कृष्ट ३ सीन्समध्ये त्याचा सहभाग नेहमीच असेल.सिनेमाची कथा खरतर सांगण्याजोगी नाहीये कारण त्याविषयी बोलण्यासारखं खुप काही आहे,त्याबाबत २०-२५ अतिशय मोठे मोठे लेख कोणीही लगेच लिहू शकतो.मोत्याची माळ गुंफ़ावी तेवढ्या सुंदरतेने आणि नाजुकपणे कथा सांभाळण्यात आलीये.आणि कथेला जोड मिळालीये ती अभिनयामूळे.

पहिल्याच नजरतेत कोणतातरी अभिनेता आवडून जावा आणि त्याचा हार्डकोर फॅन व्हाव अस सहसा घडत नाही,पण रिकार्डोच्या आणि विलामिल सोल्दाद बाबतीत तस घडेल ह्याची मला शाश्वती आहे.त्यांचा अभिनय कमाल आहे.त्यांच प्रत्येक गोष्टीकडे पाहणं,बोलणं मनाला मोहुन टाकणार आहे.आणि तसच काहीस आहे गुलेर्मो फ्रान्केला,पाबलो रागोच.सर्वांचाच अभिनय खल्लास आहे.वर नमुद केलेल्या सगळ्यागोष्टींसाठी मनापासून आभार मानायचे ते म्हणजे जुआन जोस कँप्बेलाच.त्याची दिग्दर्शनातली संयतता,मॅच्युरिटी आणि व्यवस्थितपणा कौतूक करण्याजोगा आहे.त्याला आणि संपुर्ण सिनेमाला मिळालेल ऒस्कर त्यामूळे खरच फ़ार चांगल वाटत.


सरतेशेवटी सिक्रेट पाया आहे तो प्रेम आणि पॅशन ह्या आयुष्यातल्या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टींवर;अशा गोष्टी की ज्यावर जवळपास सगळचं अवलंबून असत.ड्रामा आणि थ्रिलर ह्यांच कॉम्बिनेशन अवलंबून असत ते दिग्दर्शक आणि कलाकारांवर;ते फ़सल तर सगळच फ़सत.पण सिक्रेट कुठेही फ़सत नाही,फ़सवतही नाही.तो आयुष्य दाखवत्तो अशा माणसाच जो रिटायर होऊनसुद्धा आजवर प्रेम कबुल करायला घाबरतोय,तो आयुष्य दाखवतो अशा स्त्रीचं जिचा संसार सुखाचा आहे पण अजुनही त्याच्यासाठी ती सगळं सोडायला तयार आहे,तो आयुष्य दाखवतो अशा मित्राच ज्याने आपल्या मित्रासाठी जीव द्यायला सुद्धा मागेपुढे बघितल नाही आणि तो आयुष्य दाखवतो अशा दुर्दैव्याचं ज्याने सर्वस्व गमावलय पण ज्याने ते हिरावल आहे त्याला फ़क्त शिक्षा करण्याचच फ़क्त पॅशन असलेल्या माणसाच;एवढी मोठी भावनांची सांगड हा सिनेमा अतिशय सहजतेने मांडतो,एक असा सिनेमा जो त्याच्या प्राक्तनाशी संपूर्णपणे पात्र आहे.शेवटी एबर्ट म्हणतो त्याप्रमाणे खरोखरीच असा खरा सिनेमा फ़ारच क्वचितच बनतो आणि म्हणूनच किंबहूना अशा काही सिनेमांना परफ़ेक्ट सिनेमा म्हणतात.


अनिकेत सुरगुडे

Thursday, June 24, 2010

ब्रायन सिंगरचा अविस्मरणीय युज्वल सस्पेक्ट्स




रहस्यपटांबद्दल बोलायच तर रहस्यावर अवलंबून चित्रपट अशी त्यांची व्याख्या अजून तरी बदलली नसली तरीदेखील त्याच्या सादरीकरणात कमालीची विविधता आहे.किंबहूना साध्या रहस्यपटापेक्षा थोडा वेगळं वळण देऊन मुख्य संकल्पना मांडायची आणि ती सांगतानाच अशी सांगायची कि तीच खरी आहे यावर सर्वांच ठाम मत आहे तरीदेखील काहीतरी अजून गुढ त्यात लपलयं याची जाणीव प्रेक्षकाला करुन द्यायची.आता प्रेक्षक आपोआपच त्याकथेत गुंतायला लागतो.तो त्या प्रत्येक संभावनेचा विचार करतो जी त्याला अपेक्षित असते,किंबहूना दिग्दर्शक त्याला त्यासाठी भाग पाडतो.मग पुढे असा काही पेच निर्माण होतो की प्रेक्षक सुद्धा त्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटाकडे जाण्याची वाट बघायला लागतो.अशावेळी त्याने कितीही शक्यतांचा विचार केला तरी त्यासर्व चूकीच्या ठराव्या अशीच त्याची अपेक्षा असते कारण शेवटी त्याला फ़सायच असत,फ़सण्यामधलं सुख त्याला अनुभवायच असतं.हि अशी त्याची रहस्यपटाकडून असलेली अपेक्षा अतिशय योग्य आहे त्यात काहीही चुक नाही.मग अशावेळी त्याची दिशाभूल झाली तरी त्याला चालत,आणि आजकाल अशी दिशाभूल करण्य़ासाठी सर्वात फ़ायदेशीर ठरणार तंत्र म्हणजे अनरिलाएबल नॅरेशन.अमुकतमुक घडलय अस प्रेक्षकाला विश्वासात घेऊन पटवून द्यायच आणि नंतर जिथे सुरुवातीला होतो तिथेच आणून सोडायच.असे सिनेमे खरेतर वर्तुळासारखे असतात.यात प्रमुख पात्र म्हणजे केंद्र आणि त्याभोवती सगळ फ़िरत असत.अशावेळी तोच खोटारडा असेल तर संपूर्ण वर्तूळ खोटा ठरतो.पण तरीदेखील तोच वर्तुळ आपल्याला भावतो.कारण नोलानने प्रेस्टिजमध्ये म्हणटल्याप्रमाणे आपल्याला वेडं बनायच असतं.पण अशावेळी प्रेक्षकाला विश्वासात घेण अतिशय महत्वाच असत कारण त्याची होणारी दिशाभूल ही त्याची फ़सवणूक आहे अस वाटता कामा नये.त्यामूळे अशा अनरिलाएबिलिटी साठी महत्वपूर्ण असते पटकथा,त्यातला तपशील आणि शेवटाला ग्राह्य धरून दिल्या जाणारया हिंट्स.कारण एकदा का शेवट कळला कि प्रथमतः तो फ़ार थ्रिलिंग वाटतो मात्र पुन्हा बघितल्यावर त्यातला उथळपणा लक्षात यायला फ़ारसा वेळही लागत नाही किंवा प्रेक्षकही तेवढा तगडा लागत नाही.त्यामूळे नुसती काहीही कथा सांगून त्याचा भलताच शेवट करायचा असं दिग्दर्शकाने ठरवलं कि त्याच्या सिनेमाचा शेवट पक्का असतो अस म्हणायला हरकत नाही.

रहस्यपटात किंवा भयपटात.शेवटाला सर्वाच्च महत्व असतं त्यामूळे दिग्दर्शकाला आणि लेखकाला सगळ्यात महत्वाचे असतात ते शेवटाचे काही क्षण.ह्यात अनेक सिनेमे फ़ोल ठरतात,किंबहूना आपल्या अपेक्षा पुर्ण करण्यास त्या असमर्थ ठरतात.शेवटामूळे गाजलेल्या सिनेमे अनेक आहेत.मग तो कॅलीगरी असो,सिटिझन केन असो,निकोल किड्मनचा अदर्स किंवा नुकताच आलेला शटर आयलँड.सगळ्यांच सुत्र एकच कि सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा त्याच्याकडे बघण्याचा प्रेक्षकाचा दृष्टीकोन बदलवून टाकायचा,त्याला संपुर्णपणे चेकमेट करायचा आणि त्याला असा शेवट द्यायचा ज्याची त्याला कणभरसुद्धा अपेक्षा नसते.ह्यासर्व चित्रपटांत एक चित्रपट असा होता ज्याने प्रेक्षकाला रहस्य आणि अनरिलाएबिलिटी बरोबरच एका उत्कृष्ट न्वारची देखील चव चाखायला दिली,तो चित्रपट म्हणजे ब्रायन सिंगरचा दोन आँस्कर जिंकलेला"युज्वल सस्पेक्टस"

युज्वल सस्पेक्ट्सच कथानक आहे ते घडलेल्या एका बोटीवरील स्फ़ोटाविषयीच.पोलीस तिथे झालेल्या ९१ मिलियच्या डोप डिलच स्फ़ोटात झालेल रुपांतर आणि तिथे मेलेल्या २७ जणांबद्दल तपास करत आहेत.त्यात जेमतेम दोनच जण वाचले असून एक जण माफीचा साक्षीदार असून दुसरा त्याआगीत बराच जळालेला असल्यामूळे दवाखान्यात आहे.ह्यातला माफीचा साक्षीदार आहे व्हर्बल किंट(केविन स्पेसी).त्याला माफ़ीचा साक्षीदार म्हणून सोडण्यात आलेल आहे तरी देखील त्या बोटीवर काय झालं आणि तिथे असणारा डिन किटन(गॅब्रिएल ब्रान)नक्की मेला आहे की नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी एजंट डेव्ह कुयानला(चाझ पाल्मिंट्री) त्याची चौकशी करायची आहे.इथून व्हर्बल त्याची आणि गँगची ६ आठवड्यापुर्वीपासूनची गोष्ट सांगायला सुरुवात करतो.एका बऱ्याच मोठया दारूगोळा असणाऱ्या ट्रकच हायजॅक होणं आणि चोर म्हणून लेबल लागलेल्या ह्या पाच जणांना कधीही पोलीस उचलून कोठडीत टाकण ह्यामूळे त्याचा बदला घेण्याचा त्यांचा विचार आहे.आता हे पाच जण म्हणजे मॅकमॅनस(स्टीफन बाल्डविन) ज्याची बडया चोऱ्यांमध्ये ख्याती आहे,त्याचा सहकारी फ़ेन्स्टर(बेनिशीओ डेल टोरो),टाँड हॉकेनी(केविन पोलॉक)जो विस्फ़ोटकांमध्ये प्रवीण आहे,डिन किटन(गॅब्रिएल बाय्र्न) जो माजी पोलीस असल्यामूळे अतिशय हुशार आणि बुद्धीमान आहे आणि शेवटचा म्हणजे व्हर्बल किंट(केविन स्पेसी)जो योजना आखण्यात अतिशय कुशल आहे पण बिचारा पांगळा आहे.पोलीसांचा बदला घ्यायचा असल्यामूळे व्यवस्थित पणे ते पोलीसांच्या स्मगलर्ससाठी चालणाऱ्या टॅक्सी सर्विसचा पर्दाफ़ाश करतात आणि स्मगलींगचे खडे घेऊन कॅलिफोर्नियाला जातात,तिथे अजुन एक कामाची सुपारी देऊ घेतात.इथेदेखील ते काम चोख पार पाडतात पण स्मगर मारला जातो आणि हिरे किंवा पैसे त्याच्याकडे नसून फ़क्त ड्र्ग्स असल्यामुळे तेदेखील बुचकळ्यात पडतात.कोणीतरी अतिशय अस्खलितपणे त्यांना पोलीस लाईन अप पासून ते इथेपर्यंत आणल्या गेल्याची जाणीव त्यांना होते.प्रत्येकाकडुन अजाणतेपणाने एका बऱ्याच ताकदवर क्राईमलॉर्डच फ़ार मोठ नुकसान झालेल असून त्याच कर्ज फ़ेडणं बाकी आहे अस त्यांना वकील कोबायाशी(पीट पॉस्टेलथ्वे) सांगतो.हा ताकदवर क्राईमलॉर्ड दुसरा तिसरा कोणीनसून स्वतः कायझर सोझे आहे हे सांगितल्यानंतर मात्र प्रत्येकाची चांगलीच फ़ाटते.आता ह्या कायझर सोझेचा इतिहास अतिशय धक्कादायक तसाच भीतिदायक देखील आहे.तसच त्याला ह्या पाचही जणांबद्दल सगळ काही माहित आहे.त्याच कर्ज फ़ेडण्यासाठी दुसऱ्या एका स्मगलींग ग्रुपची ९१ मिलियनची डील उधळून लावायची आणि कर्जातून मोकळं व्हायच.अशीत्यांची डिल आहे.पुढे ह्या डिलचं नक्की काय होतं आणि मुख्य म्हणजे किटनच काय होतं हे आणि कुयान व्हर्बलच्या जुबानी संतुष्ट आहे कि नाही हे पुढे कळत.पण खरतर युज्वल सस्पेक्ट्सचा शेवट बघायचा तो फ़क्त एकाच गोष्टीसाठी आणि ती गोष्ट म्हणजे"हु इस कायझर सोझे???????"

युज्वल सस्पेक्ट्सचा इफ़ेक्ट खरतर फ़ार जबरदस्त आहे,कारण तो संपल्यावर सुद्धा मनावर तोच अधिराज्य गाजवत असतो.ख्रिस्तोफर मॅक्विरीची स्क्रिप्ट अतिशय काळजीपुर्वक आणि मोठ्या कौशल्याने बांधण्यात आली आहे.ब्रायन सिंगरच दिग्दर्शन खरोखरीच कौतुकास्पद आहे,किंबहूना हा त्याचा आजवरचा सर्वोत्कृष्ठ सिनेमा असून त्याने वापरलेले प्रसंगांना अनुसरून असलेले विनोद खरच उत्कृष्ठ आहेत.पण यात खरा कस लागलाय तो म्हणजे एडिटर जॉन ऑटमनचा आणि सर्व सहाही मुख्य पात्रांचा.सिनेमा बघितल्यावर एडिटिंगची कमाल लगेच जाणवेल.अभिनेत्यांचा अभिनय इतका खरा झाला नसता तर युज्वल एवढा यशस्वी नक्किच होऊच शकला नसता.डेल टोरो,बाल्डविन,पोलॉक ह्यांचा मेथडिक अभिनय मस्त आहे पण खरी बाजी मारली आहे ती गॅब्रिएल बाय्र्न आणि ऑस्कर विजेता केविन स्पेसीने.भुमिकेत जगणं काय असत हे ह्या दोघांकडुन कळत.

युज्वल सस्पेक्ट्सचा आत्मा दडलाय तो शेवटच्या २० मिनिटांत.ट्विस्ट एन्डींग म्हणजे नक्की काय हे हा सिनेमा बघितल्याशिवाय कळण शक्यच नाही.युज्वल सस्पेक्ट्स खरतर कमीतकमी तीनदा तरी बघावा.पहिल्यांदा रहस्यासाठी,दुसऱ्यांदा पटकथेसाठी आणि तीसऱ्यांदा अभिनयासाठी.मला खात्री आहे की कितीही वेळा बघितला तरी तो कंटाळवाणा होणारच नाही.शेवटी युज्वल सस्पेक्ट्सला मी हिचकॉकीयन पठडीतला मानतो कारण ह्यात ट्रान्स्फ़र ऑफ गिल्टचा अनुभव प्रकर्षाने जाणवतो तसच हिचकॉकच्या प्रत्येक चित्रपटात एक पंच लाईन सतत असते जी मनावर फ़ार मोठा आघात करते ह्यातही एक अशीच लाईन आहे जी आजवरच्या सर्वोत्कृष्ठ पाच लाईन्स मध्ये नेहमीच गणली जाईल आणि ती म्हणजे"The Greatest Trick The Devil Ever Pulled Was Convincing The World That,HE NEVER EXISTED"

अनिकेत सुरगुडे

Sunday, June 13, 2010

वेगळा आणि प्रगल्भ भयपट १४०८



"मानवी मन हे अनेक दुःखांनी भरलय आणि त्यामूळेच कोणत्याही सैतानासाठी मानवी मन हे सर्वात सोपं भक्ष्य आहे" अस स्टिफ़न किंगच वाक्य.त्याची प्रचिती किंवा उदाहरण म्हणून त्याने रचलेली कथा म्हणजे १४०८.ह्यातल तथ्य त्यालाच कळत ज्याला त्याचा अनुभव आलाय.मग तो कोणीही असो त्याला भिती वाटणारच.अस काही घडल की भिती ह्या शब्दाची व्याख्या आपोआपच बदलते.आता ह्याचच उदाहरण म्हणजे मिकाएल हॉस्ट्रोम दिग्दर्शित १४०८.स्टिफ़न किंगच्या कथेवर आधारलेला १४०८ हा खर भयपट असुन सुद्धा केवळ धक्क्यांवर आधारलेला सिनेमा नसून,त्याच मुळ फ़ार खोलवर आघात करणार आहे.खरतर भयपटांची विभागणी करायच झाल तर त्याचे दचकवणारे आणि घाबरवणारे असे दोन प्रकार पडतील.साधारणतः कोणालाही भयपटाकडुन अपेक्षा असते ती म्हणजे अनेक थ्रिलिंग दृष्यांची किंवा दचकवणारया प्रसंगांची.जि पुर्ण करण्याच्या नादात मुळ संकल्पनेचा बट्ट्याबोळ होतो.तर दुसरे म्हणजे भयाच्या मुळापर्यंत पोहोचणारे,जे बरयाच कमी प्रेक्षक वर्गाला भावतात.आता अशा चित्रपटांमध्ये महत्व असत ते प्रेक्षकाच त्या कथेतल्या मूळ पात्राशी संबंध जोडण्याच आणि दुसर म्हणजे रहस्य अबाधित ठेवण्याच.अतिरंजीत भयपटापेक्षा साधारण,कमी इफ़्फ़ेक्ट्स असलेला भयपट कसा रंगतो ह्याच उदाहरण म्हणजे मिकाएल हॉस्ट्रोमचा १४०८.

१४०८ च कथानक फ़िरतं ते माईक एनस्लिनच्या(जॉन क्यूसॅक) भोवती.’१० स्कॅरीएस्ट लाईटहाऊस,’१० स्कॅरीएस्ट शिप्स’ अश्या रंजक पुस्तकांचा तो लेखक आहे.त्याचे वडींलांबरोबरचे संबंध काही चांगले नाहीत.तसच मेलेल्या मूलीच दुःख तो आपल्या उराशी बाळगून आहे.लॉस एंजेलिसला सी सर्फ़िंग करताना त्याला दुखापत होते.दुसरया दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये त्याला आलेल्या इन्विटेशन्स मध्ये डॉल्फिन हॉटेलच पोस्टकार्ड त्याला सापडत."डू नॉट एंटर १४०८" असं त्यावर लिहिलं असल्यामूळे हेच माझं पुढच डेस्टिनेशन अस तो ठरवतो.आपल्या पब्लिशरला फ़ोन करुन तो १४०८बद्दल अजुन माहिती मिळवतो.त्याच्या शंकेने माईकची १४०८ मध्ये जाण्याची अजुनच बळकट होते.डॉल्फिन हॉटेलचा फोनवरुन काही प्रतिसाद न मिळाल्यामूळे तो थेट हॉटेलमध्ये प्रवेश करतो.तिथे हॉटेलचा मॅनेजर जेराल्ड ओलिन(सॅम्युएल जॅकसन) त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावतो आणि १४०८मध्ये घडलेल्या रहस्यमयी मृत्युंबद्दल तो माईकला सांगतो.तिथे झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा आम्ही दाखवला तर चक्रावशील अस जेराल्ड परत परत सांगतो तरीसुद्धा आपलीच खरी करत माईक १४०८ मध्ये राहण्याचा हट्ट सोडत नाही.एक महागडी दारूची बाटली देऊ करुन सुद्धा माईक आपला हट्ट सोडत नाहीये हे बघून शेवटी १४०८ची चावी माईकला द्यायला जेराल्ड तयार होतो.१४व्या मजल्यावरल्या १४०८ मध्ये प्रवेश करताच तो संपूर्ण खोलीची निरखून पाहणी करतो.अचानक विचित्र अनुभव त्याला येऊ लागतात.हे थांबल्यानंतर तो तो आराम करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तेथील घडयाळ ६० मिनिटांचा काऊंटडाऊन वेळ दाखवायला सुरुवात करतो.पुन्हा अतिशय चमत्कारिक प्रसंग घडायला सुरुवात होते.घाबरल्यामूळे तेथून बाहेर पडण्याच्या बेतात असतानाच अचानक दरवाजा कुलुपबंद होऊन चावी दरवाज्यात निघून जाते.अचानक एक अस्प्ष्ट आकृती त्याच्या खिडकीतुन बाहेर उडी मारते.पूढे तो समोरच्या बिल्डींगमधल्या माणसाला हातवारे करुन मदत कर असं सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र तो सुद्धा माईकचं आहे हे बघून तो चकीत होतो.त्याच्या मागून एक विचित्र व्यक्ती त्याच्यावर हल्ला करतीये अस माईकला जाणवत,पण तो त्याचा भास असतो.स्वतःला शांत करत तो हे सगळ जेराल्ड्ने दिलेल्या दारुमुळे आणि रुममधल्या चॉकलेट्समूळे होतय असा विचार करत असतानाच टिव्हीवर अचानक त्याचा घरचा विडिओ लागतो.मेलेल्या मुलीच्या आठवणींमूळे तो अजुनच त्यात गुंतत जातो.वडीलांच्या आणि मुलीच्या आठवणींमुळे स्वतःचा स्वार्थीपणा त्याला कळून चुकतो.पुढे नशीबाने तो आपल्या पत्नीबरोबर विडिओ चॅट करून तिला तिथल्या परिस्थिती बाबत सांगतो आणि पोलिसांना बोलावायला सांगतो.एवढ्यात संपुर्ण खोली पाण्याने भरुन जाते आणि अचानक माईक सुरुवातीला असणारया समूद्राच्या ठिकाणी पोहोचतो.ही सत्य परिस्थिती आहे कि त्याचा भ्रम हे पुढे कळत.तो सुखरुपपणे १४०८ मधून बाहेर पडतो की नाही आणि १४०८च काय होत हे चित्रपटाच्या उरलेल्या भागात सांगितल जात.

सिनेमातले काही सिन्स खरोखरीच खोल परिणाम करणारे,आणि निःशब्द करणारे आहेत.त्यातला एक म्हणजे आपल्या मेलेल्या मूलीशी बोलत असताना माईक तिला मिठी मारतो आणि पुन्हा एकदा ती मरते हा सिन खरोखरीच स्तब्ध करणारा आहे.१४०८ हा त्याच्या आकडयापासूनच १३ हा सैतानाचा आकडा दाखवायला सुरुवात करतो.अनेक दृष्यातून उत्कटपणे मांडण्यात आलेला १३ हा आकडा खरतर चित्रपटकर्त्यांची हुशारीच म्हणता येईल.बाकी कॅमेरावर्क अतिशय सुंदर आहे.भयपटांसाठी अपेक्षित असणारे विचित्र अँगल्स नसले तरी त्याची प्रखरता तेवढीच आहे.शांत तरीदेखील परिणामकारक संगीताचा उत्तम वापर त्याची गूढता वाढवतो.मिकाएल हॉस्ट्रोमचे आधीचे सिनेमे(डिरेलेड आणि तत्सम) आणि हा याचा विचार केल्यास दिग्दर्शकाची उत्क्रांती लक्षात येण्याजोगी आहे.जॉन क्यूसॅक ह्याचा खरतर "वन मॅन शो" आहे अस म्हणटलं तरी हरकत नाही तरीदेखील काही वेळासाठीच असणारा सॅम्युएल जॅकसन लक्षात ठेवण्याजोगा अभिनय करुन जातो.

१४०८ची परिणामकारकता हि त्याच्या असणारया रहस्यातच आहे.हे रहस्य प्रत्येकालाच लहानपणापासून माहीत असत,कारण ते प्रत्येक व्यक्तीच स्वतःचच असत.काही विशिष्ट घटना आपल्याकडून चुकून घडून गेलेल्या असतात ज्याची उकल लगेच होऊन सुद्धा आपण तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो.त्यापासून दूर जातो आणि दुसरीकडे मन रमवण्याचा प्रयत्न करतो.सरतेशेवटी १४०८चा सैतान हा सर्वश्रेष्ठ आहे कारण तो कोणीनसून आपण स्वतःतलाच आहे.ज्याचा सामना करण फ़ार कठीण आहे.त्यामूळे सिनेमाच्या टॅगलाईन प्रमाणेच हे म्हणणं खर ठरेल की "सम रुम्स आर लॉक्ड फॉर अ रिसन"

अनिकेत सुरगुडे

Sunday, May 16, 2010

शेरलॉकची इमेज बदलणारा होल्म्स



शेरलॉक होल्म्स असा प्रायव्हेट डिटेक्टिव जो सर्वांच्या मनावर राज्य करतो.किंबहुना तो आजवरचा लिहिला गेलेला सर्वोत्तम डिटेक्टिव.त्याच व्यक्तिमत्व,विद्वत्ता आणि तेवढच म्हत्वाच म्हणजे डॉ.वॉटसन आणि २२१ B ;आणि ह्या सगळ्याच श्रेय केवळ एका व्यक्तीला ती म्हणजे सर आर्थर कॉनन डॉयल.सर डॉयलांच्या ह्या असामान्य होल्म्सने मालिका,चित्रपट अशा माध्यमांतून नेहमी कमाल केली.ह्या सगळ्यात मोठा वाटा होता तो म्हणजे होल्म्स रंगवलेल्या अभिनेत्याचा.काहींना तो जमला तर काहींना नाही,मात्र प्रत्येकाने आपआपल्या परीने होल्म्सला पुर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न नेहमीच केला.ह्यात सर्वात यशस्वी ठरला तो म्हणजे ग्रेंडाच्या मालिकांमधला जेरेमी ब्रेट.त्याने उभा केलेला होल्म्स तंतोतंत सर डॉयलांच्या होल्म्सला मिळणारा होता.त्याने आपली एक वेगळीच छाप लोकांच्या मनात उभी केली.त्याच्यापेक्षा उत्तम होल्म्स उभा करणे शक्य नाही यात अजिबात वाद नाही.मात्र ब्रेटच्याच ताकदीचा होल्म्स एका कलंदराने रंगवून दाखवला.तो कलंदर म्हणजे रॉबर्ट डाऊनी ज्युनियर.डाऊनीचा होल्म्स आणि ब्रेटचा होल्म्स यात म्हणटलं तर बराच फ़रक आहे आणि नाही सुद्धा.

तसं कोणत्याही डिटेक्टिव सिनेमाच कथानक फ़ारस काही वेगळ नसत.एक अतिशय विद्वान डिटेक्टिव,त्याचा आयुष्यात तस फ़ारस काही बरं चाललेलं नसणं,पुढे त्याच्याच तोडीचा शत्रू त्याला मिळणं,त्याचे जग हादरवणारे प्लॆन्स आणि हिरोच त्याला थांबवण.अशा वेळी विलक्षण महत्व प्राप्त होत ते सिनेमाच्या सादरीकरणाला.तसच कथानक गतीमान ठेवण देखील तेवढच महत्वाच ठरत.अशावेळी सगळी जबाबदारी येउन पडते ती दिग्दर्शकावर आणि लेखकावर,आणि त्यांच्या ह्या क्षमतेवरच सिनेमाची क्षमता आणि यश अवलंबून असत.पण तरी देखील काही सिनेमे यात कमी पडुन देखील फ़ार वेगळ्या उंचीवर जातात आणि त्याला कारणीभूत असतो तो अभिनेत्यांचा अभिनय.गाय रिचीच्या होल्म्सची अशीच काहीशी गंमत आहे.

कथा सुरु होते ती लॉर्ड ब्लेकवूडच्या(मार्क स्ट्रोंग) पकडल्या जाण्याने.काळ्या जादूचा वापर आणि खुनांच्या आरोपाखाली त्याला फ़ाशीची शिक्षा सुनावण्यात येते.मरण्याआधी तो होल्म्सला भेटण्याची मागणी करतो.’पुढे घडणारया घटना तुझ्या आवाक्याबाहेर असणार आहेत तेव्हा तयार रहा असं तो होल्म्सला सांगतो.फ़ाशीनंतर तो मेल्याची वॉटसन(ज्युड लों)स्वतः खात्री करतो.यशस्वी केसचा आनंद तसच वॉटसनच केसेस मधून तसच २२१B मधून बाहेर पडण्याच्या विचाराने वैतागलेल्या होल्म्सची डोकेदुखी आयरीन एडलर(रेचेल मेकेडम्स) आपल्या रहस्यमयी वागण्याने वाढवते.तसच ती कोण्या रेओर्डन() ची केस देउन वाढवते.इकडे अचानक ब्लेकवूड जिवंत होऊन पळून गेल्याची बातमी होल्म्स आणि वॉटसनला मिळते.ब्लेकवूडच्या थडग्यात रेओर्डनच शव सापडत,आणि सुरु होतो तो ब्लेक्वूडला शोधण्याचा प्रवास.रहस्यमय आयरीन एडलर,ब्लेकवूडची जगाला हादरवणारी योजना आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे पुढच्या भागासाठी केलेली रचना यासाठी होल्म्स बघावाच.

पटकथेला जर व्यवस्थित फ़्लो मिळाला नाही तर सिनेमातल्या पटकथेतल्या चुका लगेच जाणवतात.होल्म्समध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते.आता ह्या साठी घेतलेले ५ लेखक जेवढे कारणीभूत आहेत तेवढाच कारणीभूत आहे तो म्हणजे गाय रिची.पण तरी देखील रिचीच कौतूक एवढ्यासाठीच की त्याने बदलेली होल्म्सची इमेज.जर त्याने शांत होल्म्स दाखवला असता तर सिनेमाची डोक्युमेंट्री व्हायला वेळ लागला नसता.अभिनयतर सगळ्यांच जुळून आलाय.रॉबर्ट डाऊनी आणि जुड लोची केमिस्ट्रीतर अगदी धमाल आहे.बाकी हेन्स झिमरच संगीत एकही बीट सोडत नाही,तसच १८व्या शतकातल लंडन अतिशय सुंदर उभारलय.सिनेमाच सर्वस्व दडलय ते रॉबर्ट डाऊनी ज्युनियरमध्ये.कोणताही सिनेमा अभिनयाने देखिल सुंदर बनवता येतो हे त्याने सिद्ध केलय,त्यामुळेच त्याला मिळालेल गोल्डन ग्लोब अतिशय सार्थ आहे अस म्हणण्यात हरकत नाही.शेवटी शेरलॉक होल्म्समध्ये कमी पडलेला रिचीने पुढील भागात कहर करावा अशी फ़ार ईच्छा आहे आणी तस जरी नाही झाल तरी पुन्हा एकदा चित्रपट उत्कृष्ट बनवायला रॉबर्ट डाऊनी असेनच.

Sunday, March 7, 2010

सिरियल किलर्सच्या गूढ साम्राज्यात - डिस्टन्झ



सिरियल किलर्स, रहस्यमयी,राक्षसी,अमानवी आणि गडद व्यक्तिमत्वाचे.त्यांच्याविषयी एका वेगळ्याच प्रकारची भीती मनात असते.किंबहुना त्यांची कृत्यच एवढी भयंकर आणि निर्घुण असतात कि अशी भीती वाटणं साहजिकच आहे.पण असं कितीही असलं तरी हे सिरियल किलर्स आपल्याला आवडून जातात,अगदी डझनभर माणसं मारली तरीसुद्दा.ह्याचं एक कारण म्हणजे "प्रत्येकातच एक सिरियल किलर दडलेला असतो." विधान धाडसी असलं तरीसुद्धा त्यात तथ्य नक्किच आहे.कारण प्रत्येकातच एक विचित्र प्रकारची विकॄती लपलेली असते,ती केवळ बाहेर पडायचा अवकाश असतो.सिरियल किलर्सच्या बाबतीत हिच त्यांची विकॄती अशक्य थराला जाते,आणि छळातून अथवा खुनातून त्यांना स्वर्गानंद मिळतो.आता त्यांच्या ह्या अवस्थेला बरयाच गोष्टी अवलंबून असतात.मनावर झालेला आघात,बदला,इर्षा अशा अनेक गोष्टी असू शकतात.त्यांनी मारलेली लोकं ही त्यांच्या ओळखीची असलीच पाहीजेत असं त्यांचा आग्रह नक्किच नसतो.काही सिरियल किलर्स हे बदला किंवा तत्सम गोष्टी लक्षात घेवून हत्या करतात तर काहींना कोणताही माणूस चालतो;फ़क्त छळ किंवा हत्या करणं आणि त्यातून आनंद मिळवणं एवढचं त्यांचं उद्दिष्ट.थोमस सिबेनच्या डिस्टन्ज आहे तो असाच काहीसा.

डिस्टन्झची कथा आहे ती अजिबात भयंकर नसलेल्या डॆनिअल बोअरची(केन ड्य़ुकेन) कारण मुळातच त्याला छळवाद मान्य नाही.त्याची चूक एवढीच की त्याला व्यसन लागलय,खून करायच;नाहीतर तो साधा सफ़ाई कामगार आहे एका बोटॆनिकल गार्डनचा.गार्डन साफ़ करणे,कचरयाची विल्हेवाट लावणे एवढचं त्याच काम.जेव्हा तो हजेरी लावण्यासाठी ओफ़िस मध्ये येतो तेव्हा त्याला लाईन देणारी जेना(फ़्रान्झिस्का वीझ)कडे बघणं आणि निघून जाणं एवढीच त्याची लव्हलाईफ़.त्याच घरदेखील धडं नाहीये,घरात एक फोटो नाही किंवा ते व्यवस्थित फ़र्निश्डही नाही.ह्यासगळ्यातून तो बिचारा किती एकटा आहे याची जाणीव सिबेन परोपरीने करुन देतो.तो एकटा आहे,शांत आहे,पण त्याच मन विचित्र प्रकारच्या वादळाने अस्वस्थ आहे,आणि त्यावर उपाय देखील त्याला सापडत नाहीये .एके रात्री तो पूलावरुन खाली एक दगड सोडतो,अक्सिडेंट झाल्याचा आवाज येतो,मात्र तो शांतपणे तिथून निघून जातो.रेडिओवर जेव्हा तो हि बातमी ऐकतो तेव्हा एका वेगळच समाधान त्याला लाभलयं हे लगेच कळून येत.पण हि फ़क्त सुरुवात आहे,कारण त्याला कोणत्या गोष्टींमधून आपली अस्वथता समाधानात बदलायची हे कळलय.तो उतावळेपणाने शिकारयांची बंदूक चोरतो आणि शांतपणे बागेत दोन ंमाणसांना मारतो.मात्र कुठेतरी आपण चुकतोय याची जाणीव त्याला होते,आणि तो जेनाबरोबर स्थायिक होतो.पण शेवटी व्यसन ते व्यसनच ज्याप्रमाणे दारुचा पहिला घोट घेण्याआधी त्याचा विचार करायचा असतो तसचं काही डेनिअलबद्दल घडतय.तो पुढचा खुन करण्यासाठी आतूर झालाय.हे होतानाच पोलिसांचा संशय डॆनिअलवर आलाय,एव्हाना ते त्याच्या घरीसुद्धा पोहोचले आहेत,मात्र जेना व्यवस्थितपणे पोलिसांची दिशाभूल करते.ह्या जेनाबद्दल ह्या वळणावर संशय नक्किच निर्माण होतो पण तेवढ्यात ती डॆनिअलला कनव्हिन्स करते आणि बंदूक शोधून काढते.शांतपणे हि बंदूक नदीत फ़ेकुन देण्यासाठी दोघेही निघतात;पण हा शेवट असूच शकत नाही कारण,शेवटी त्याने जी कर्म केली आहेत त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी.आणि ती मिळते.शेवटाबद्दल इतकच की "माणूस आपली व्रुत्ती बदलू शकतो,प्रव्रुत्ती नाही".

सिरियल किलर्सवरल्या सिनेमांमध्ये जर त्या सिरियल किलरला थोडीफ़ार जरी सहानभूती मिळाली नाही तरी तो चित्रपट अपूर्ण वाटतो.पण डिस्टनझ बद्दल तस नाही,तो नक्किच सहानभूती मिळवतो. जास्तीत जास्त स्टिल कॆमेरा आणि संगीताचा कमी पण व्यवस्थित वापर चित्रपटाला बांधून ठेवतात.सिबेनचा पहिलाच सिनेमा असला तरीसूद्धा त्यात तांत्रिक चूकांना वाव नाहिये.शेवटी डेनिअल हा अतिशय साधा,शांत खूनी आहे आणि त्याला शेवटी तेच मिळतं जे तो डिसर्व्ह करतो,बहुतेक हेच सिबेनला दाखवायच असेल.

Thursday, January 14, 2010

द मिस्ट


’देअर इज समथिंग इन द मिस्ट’ असं ओरडत,नाक फ़ुटलेल्या अवस्थेत तो त्या सुपरमार्केट मध्ये शिरतो.त्याच्या सांगण्यावरुन त्य दुकानाचे दरवाजे बंद करण्यात येतात.दुकानासमोर साचलेल्या घट्ट मिस्टसारखच आपल्या मनात देखील एक वेगळच ’मिस्ट’ साचयला सुरुवात होते.

नोर्मली साय-फ़ाय सिनेमे फ़क्त इफ़ेक्ट,वैद्यानिक संकल्पना आणि गूड एन्डिंग एवढच देतात.किंबहुना आपली अपेक्षाच तेवढी असते. मात्र मिस्ट कुठेतरी साय-फ़ाय असून सुद्धा नकळतच ह्या सीमारेषा ओलांडून पुढे जातो.स्टीफन किंग ह्यांच्या कादंबरीवर आधारलेला आणि दिग्दर्शक फ़्रॆन्क डाराबोंटचा द मिस्ट हा रहस्य आणि हॊरर चित्रपटांची चौकट मोडतोच मात्र मानवातल्या राक्षसालादेखिल सगळ्यांसमोर आणतो.



आता हा चित्रपट सुरु होतो तो वादळाने आणि जणू काही येणारया वादळाची जाणीव दिगदर्शक इथुनच करुन देतो.डेविड ड्रेटोन (थोमस जेन) हे ह्या चित्रपटातलं प्रमुख व्यक्तिमत्व.तो चित्रपटांचे पोस्टर बनवतो.रात्री झालेलं वादळ आणि झाडांची पडझड ह्यामुळे डेविडचं बरचं नुकसान झालय.त्याच्या शेजारी राहणारया नोर्टन(आन्द्रे भ्रोहर) मुळे त्याच्या बोट हाऊसचा देखील सत्यानाश झालाय.झाड पडून ह्या नोर्टनची देखील गाडी उध्वस्त झालीये.सुपरमार्केटकडे निघालेले डेविड,त्याचा मुलगा,आणि नोर्टन रस्त्यात बरयाच सैनिकांना डोंगरच्या दिशेने जाताना पाहतात आणि विषय निघतो तो ’एरोहेड प्रोजेक्ट’चा.दुकानात पोहोचल्यावर चमत्कारिक रित्या वागणारे सैनिक,त्यांना ५ मिनिटे देणारा पोलिस ह्या सगळ्या गोष्टी गुंता वाढवतात.नंतर अतिशय घाबरलेला आणि नाकातून रक्त येत असलेला डॆन ’समथिंग इन द मिस्ट टूक जॊन ली’ असं ओरडत दुकानात शिरतो आणि दरवाजे लावायला सांगतो.दुकानातुन बाहेर पडलेला एक गाडीकडे जातो आणि येणारया धुक्यात झाकला जातो.थोडयाच वेळाने त्याचा किंकाळी ऐकु येते.धुक्यामुळे दुकानाबाहेर काय घडतय याची अजिबात जाणीव होतं नाही.मात्र बाहेर काहीतरी भयंकर घडतय याची जाणिव पदोपदी होते.यानंतर डेविडला स्टोररूम मध्ये येणारा अनुभव आणि त्याची खात्री करण्यासाठी स्टोररूम मध्ये डेविड आणि बरोबर गेलेले दुकानातले कर्मचारी त्यांच्या देखत कोणत्यातरी अपरिचित गोष्टीमुळे नोर्मचा होणारा म्रुत्यु ह्यावरुन त्यांना बाहेर काहीतरी विचित्र प्रकारच्या जीव फिरत आहेत ह्याची जाणीव होते.ह्या सगळ्या गोंधळात भर पडते ती म्हणजे मिसेस कारमोडी (मारशिआ गे हारडन) मुळे.देव आणि ’एन्ड ओफ़ डेज’ वैगेरे बद्दल बोलून ती अधिक त्रास देते.स्वतःला देवाने पाठवलं आहे,आणि हे सगळ आधीच लिहिलय अस सारखं सारखं सांगुन ती त्या लोकांवर फ़ार हॆमेरींग करते.त्याच रात्री विचित्र किडय़ांचं दुकानात शिरण आणि म्रुत्युमुखी पडणारे लोक हे सगळा प्रसंग बिकट बनवतात.दुसरया दुकानातून औषधं आणण्यासाठी गेलेल्या डेविड आणि मंडळींना सुरुवातीला सैनिकांना पाच मिनिटे देणारा पोलीस अतिशय विचित्र अवस्थेत सापडतो.’ही आमचीच चूक होती ’ अस म्हणटल्यावर साहजिकच आता आठवण होते ति ’एरोहेड प्रोजेक्टची’.दुकानात परत आल्यानंतर चित्रपट जवळपास एका दिवसाने पुढे जातो,मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे.मिसेस कारमोडी जवळपास सगळ्यांच ब्रेनवॊश केलय.आता हि लोकं कारमोडीला देवाने पाठवलेली असून ती सांगेन तीच पूर्व दिशा मानत आहेत.डेविड,जेस्सप (सॆम विटवेर)ह्या सैनिकाला स्टोररूम मध्ये नेतो आणि एरोहेड बद्दल विचारतो.आता हा अएरोहेड प्रोजेक्ट म्हणजे काय आहे,त्याचा परिणाम कसा झालाय,आणि बाहेर काय कशामूळे घडतय हे साफ़ होत.मात्र एवढ्यात जिम(विलियम सॆडलर) ह्या जेस्सप ला सगळयांसमोर नेतो.आता ही मिसेस कारमोडी ख्रिश्चिनिटी आणि मानवाने देवासाठीच राखीव असणारया गोष्टींबद्दल केलेला हस्तक्षेप आणि ’एक्सपिएशन’ बद्दल बरच लेक्चर देते.जणूकाही ह्या जेस्सपमूळेच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ह्यामूळे बिचारया जेस्सपची निर्घूण हत्या केली जाते.आता मात्र बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही हे समजल्यावर डेविड आणि त्याच्या बरोबरचे सहा जण बाहेर जायला निघतात.मात्र इथेही ही कारमोडी ह्यांना आडवी येते.’डेविडच्या मुलाला वेगळं करा आणि त्याला बाहेरच्या राक्षसाला सुपुर्त करा म्हणजे बाहेरचा राक्षस शांत होईल’असं म्हणणारया कारमोडीच पुढे काय होतं?,तसचं ही मंडळी बाहेर पडतात का,आणि ते जिवंत राहतात की म्रुत्यूमुखी पडतात?म्हणजे अर्थातच शेवट कसाय आणि का तो एवढा अर्थपूर्ण का आहे हे शोधण्यासाठी चित्रपट बघायलाच पाहिजे.

दिग्दर्शक फ़्रॆन्क डेराबोंटने ज्याप्रमाणे ’शौशन्क रेडेम्शन’मध्ये मानवी व्रुत्तीच सुरेख चित्रण केलय त्यापेक्षा किंचित जास्तच चांगल चित्रण द मिस्ट मध्ये झालय.संकट आल्यावर माणूस कोणावरही विश्वास ठेवतो,स्वतःचा जीव वाचावा ह्यासाठी अंधश्रद्धा आणि ह्या अंधश्रद्धांसाठी माणूस माणसाचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाही ह्याच सुरेख चित्रिकरण डेराबोंटने केलय(जे अगदी खरयं).अप्रतिम सिनेमॆटोग्राफ़ी ह्या चित्रपटाची गूढता फ़ारच वाढवते.चित्रपटात भाव खाऊन जाणारी एकमेव व्यक्ति म्हणजे मारशिया गे हारडेन.तिचा अभिनय खरोखरीच फ़ारच नैसर्गिक आहे.तिचा अभिनय कुठे तरी आपल्याला सुद्धा चीडवून देतो.ह्या चित्रपटाचा शेवट बरयाच जनांना चुकीचा वाटतो.मात्र चित्रपटाचा शेवट हिच खरं चित्रपटाची ताकद आहे अस मला वाटतं.

अनिकेत सुरगुडे

Saturday, November 28, 2009

उत्कृष्ट,अति उत्कृष्ट,सर्वोत्कृष्ट



वेस्टर्न चित्रपट म्हंटले कि अंगात काहीतरी संचाराल्याचा भास होतो प्रत्येकालाच होता असेल.त्यातून सर्जिओ लेओने म्हणजे प्रश्नच नाही आणि त्यात इस्त्वूड म्हंटल्यावर दुधात साखर. गुड, bad , उगली बाबत असंच काही आहे

athaa आहे ती म्हणजे ती गुड(क्लिंट इस्टवूड), bad (ली वान क्लीफ्फ) आणि अगली (एली वाल्लाच)यांची
.यांमधला अगली म्हणजेच तूको ह्या अट्टल गुन्हेगार आहे. गुड म्हणजेच ब्लोंडी हा एक कुशल नेमबाज आहे.आणि bad म्हणजेच सेतेन्झा किंवा एंजेलआयीज हा प्रोफेशनल मारेकरी आहे.

तूकोच्या गुन्ह्यांमुळे त्याच्यावर बरचं मोठ बक्षीस ठेव्यात आला आहे.ब्लोंडी हा त्याचा पार्टनर आणि त्यांची पार्टनरशीप म्हणजे ब्लोंडी ने तूकोला पकडून देणे,बक्षीस घेऊन,त्याला ऐनवेळी सोडवणे आणि मिळालेली रक्कम दोघात वाटून घेणे.तिसरं पात्रं म्हणजेच सेन्तेन्झाला;बरंच सोने असेली पेटी बिल कारसनने लपावली असल्याच
कळत आणि तो त्याचा शोध सुरु करतो.
"ह्यापेक्षा जास्त बक्षीस तुझ्यावर ठेवलं जाणार नाही" असा म्हणून ब्लोंडी तूको बरोबरची पार्टनरशीप तोडतो आणि वाळवंटात त्याला सोडून देतो.वाळवंटातून कसातरी करून तूको बाहेर पडतो आणि ब्लोंडीला शोधतो आणि बदला घेतो.त्रीव्र उन्हात तूको,ब्लोंडीला वाळवंटात पाण्याशिवाय चालवतो.वाळवंटात चालून चालून ब्लोंडी मरणार आणि तूकोचा बदला पूर्ण होणार ह्याचवेळी एक बग्गी तूकोला दिसते आणि तिला तो थांबवतो.मेलेल्या कॉनफेडेरेट सैनिकांच्या ह्या बग्गीत अर्धमेला सैनिक बिल कारसन तूकोला पाण्याची मागणी करतो.त्याबदल्यात २००,००० सुवर्णमुद्रा कोणत्या ग्रेवयार्ड मध्ये आहे ते सांगतो.हे सांगितल्या नंतर तूको पाणी आणतो मात्र कारसन कोणाच्या सोने कोणाच्या थडग्याखाली आहे हे तूकोला सांगण्या आधीच मरतो.मात्र मरण्याआधी तो कोणत्या थडग्याखाली सोने आहे ते ब्लोंडीला सांगतो(शेवटी इस्टवूड नायक आहे, तास त्याला काहीही महत्व नसलं तरीही आता त्याला प्राप्त झालंय).खरा चित्रपट इथूनच सुरु होतो.मरणाला टेकलेल्या ब्लोंडीला बरं करण्यासाठी त्या सैनिकांचे गणवेश घालून तूको त्याच्या भावाच्या ख्रिश्चन धर्मांधसंस्थेत घेऊन जातो आणि ब्लोंडीला बरं करतो.नंतर दोघे आपल्या उद्देश्याकडे प्रस्थान करतात(मात्रं दिग्दर्शकाला त्यांना सुरळीतपणे पोहोचवायचे नाहीये).कॉन्फेडेरेटोर्सचा युनीफॉर्म असल्यामुळे ते मध्येच युनिअनच्या सैनिकांकडून बंदिवासात टाकले जातात.बिल कारसन मिळेल या हेतूने सेन्तेन्झा देखील सारजेन्त म्हणून तेथे असतो.हजेरीच्यावेळेस मी बिल कारसन आहे असं सांगितल्यामुळे सेन्तेन्झा तुकोला सोन्याची नाणी कुठे आहेत हे सांगण्यासाठी मारमार मारतो,ग्रेवयार्ड मध्ये कोणाच्या काबारीखाली नाणी आहेत हे फक्त ब्लोंडीला माहित आहे हे कळल्यावर सेन्तेन्झा ब्लोंडी ला पार्टनर बनवतो आणि आपल्या सहा विश्वासू माणसांबरोबर निघतो.सेन्तेन्झाच्या माणसाच्या तावडीतून सुटून जवळच्या गावात जातो,तिथे विश्रांतीसाठी थांबलेला ब्लोंडी त्याला भेटतो आणि दोघे आपली जुनी पार्टनरशीप कायम करतात.सेन्तेन्झाला मारणार इतक्यात त्याच पळून जाणं,त्याचं युद्धात अडकणं गोष्टी विचित्र बनवतात.नदीच्या दुसऱ्याबाजूची दफनभूमी आणि तिथे जाण्यासाठी,त्यांच्यात असलेला पूल उडवणे महत्वाचे आहे हे कळल्यावर ब्लोंडी आणि तूको पूल उडवतात.बॉम्ब लावताना तूको ब्लोंडीला कबरीचे नाव विचारतो,आणि ब्लोंडी सांगतो.पूल उडवल्यानंतर तूको ब्लोन्डीला दगा देऊन कबरीस्तानाच्या दिशेने निघून जातो.ब्लोन्डीने सांगितलेली कबर तो खोदण्यास सुरुवात करतो पण तेवढ्यात आपला हिरो म्हणजे ब्लोंडी तेथे पोहोचतो आणि villan सेन्तेन्झासुद्धा.शेवटी एकमेकांच्या गन पोईंट वर असणाऱ्या तिघांपैकी कोण जिवंत रहातं आणि कोण मरतं,शेवटी खरचं सोन्याची नाणी ब्लोन्डीने सांगितलेल्या ठिकाणी असतात का? हि उत्तर मिळवण्यासाठी चित्रपटच बघावा(सगळा चित्रपट सांगितल्यानंतरसुद्धा तो बघावा अशी विनंती).

शेवटी वेस्टर्न चित्रपटांचे बादशाह क्लिंट इस्त्वूड आणि सर्जिओ लेओने ह्यांचा चित्रपट म्हणजे उल्लेखनीय असणारच मात्र ' गुड , बड, उगली' त्यापेक्षा वरचढ वाटतो.उत्कृष्ट cinematography ,संगीत,acting ह्या सर्वच गोष्टी चित्रपटाला वेगळाच दर्जा देऊन जातात आणि त्याला उत्तम,अतिउत्तम आणि सर्वोत्तम बनवतात.