Wednesday, September 23, 2009

The Prestige---

काहींना मैत्री आणि त्यातून निर्माण होणारे शत्रुत्व म्हणजेच ड्रामा ह्या genre चे चित्रपट आवडतात,काहींना Sci -Fi आवडतात,तर काहींना रहस्यपट आवडतात.पण जर या तीन गोष्टींना एकत्र केले आणि त्याला सगळ्यांची मांडणी जादुबरोबर केली तर? तर तयार होतो ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'The Prestige '.

बऱ्याच गोष्टी एकाच वेळी घडत असल्या मुळे प्रेक्षकाची तारांबळ नक्कीच उडते.पण जर व्यवस्थित समजला तर 'The Prestige' तुम्हाला नक्कीच फारआवडेल.
प्रत्येक महान 'Magic trick' चे तीन भाग असतात.पहिला भाग 'The Pledge',यात जादुगार काहीतरी साधी वस्तू दाखवतो उदा.पत्ते,पक्षी,माणूस वैगेरे.दुसरा भाग असतो 'The Turn' यात जादुगार सामान्यातून काहीतरी असामान्य करून दाखवतो.आता तुम्ही त्यातली गोम शोधायचा प्रयत्न करता........मात्र ती सापडत नाही,कारण तुम्ही तिथे नीट बघत नाही.कारण तुम्हाला ती शोधायचीच नसते,तुम्हाला वेडं बनायचं असत.तरीसुद्धा तुम्ही अजून टाळ्या वाजवणार नाही,कारण एकदा गायब केलेली पुन्हा परत आणायची असते.ह्यामुळेच सगळ्यात महत्वाचा आणि अवघड भाग असतो तो म्हणजे 'The Prestige"

ह्या नोट वर सुरु होणारा 'The Prestige' सुरुवातीपासूनच पुढे काय होईल याची हुरहूर लावतो.मैत्री आणि त्यातून निर्माण होणारे शत्रुत्व ह्यावरचे अनेक चित्रपट सर्वांनी बघितले असणारच याची मला खात्री आहे.पण ह्या विषयामध्ये The Prestige' इतपत सरस चित्रपट मी अजून पाहिलेला नाही(अजून चांगला कोणता असेल तर कृपया कळवा).
चित्रपट सुरु होतो तो आल्फ्रेड बोर्डन (Christian Bale)च्या पकडल्या जाण्याने.Robert Angier(Huge Jackman) चा द रिअल ट्रान्सपोर्टेद man चा खेळ सुरु असताना आल्फ्रेड स्टेज खाली जातो,आणि त्याला पाण्याच्या box मध्ये मरणारा रोबेर्ट दिसतो,सगळा आळ आल्फ्रेड वर येतो.जेल मध्ये बंद असलेला आल्फ्रेडला ओवेन नामक solicitor आपल्या सगळ्या ट्रीक 'लॉर्ड कॅद्लोव' ला वीक आणि ते तुझ्या मुलीचा भविष्यकाळ उज्वल करतील असे सांगतो.जाता जाता तो Angier ची डायरी आल्फ्रेड जा देऊन जातो.तेथून सुरु होतो Angier चा प्रवास.त्याच कॉलोराडो स्प्रिंग्स मध्ये येणं,टेसला ने त्याच्या मित्र साठी बनवलेली मशीन वैगेरे, पुढे काय होणार याची उत्सुकता लावतात,तेवढ्यात चित्रपट flashback मध्ये जातो.


एक जादुगार,प्रेक्षकांमध्ये प्लॉट केलेले आल्फ्रेड आणि Angier,शो गर्ल म्हणून काम करणारी Angier ची पत्नी जुलिया(Piper Perabo) आणि काही विपरीत घडले तर त्यासाठी कटर(Michael Caine) अशा सगळ्या पात्रांची माहिती नोलान एकाच दृश्यात देऊन टाकतो.जादूचा खेळ सुरु असताना Cutter ने सांगून सुद्धा चुकून आल्फ्रेड कडून चुकीची गाठ बांधली जाते आणि त्यामुळे जुलिया चा प्राण जातो.या सगळ्यात Angier आल्फ्रेडला जवाबदार ठरवतो आणि दोघांमध्ये वैर निर्माण होते.आल्फ्रेड आपली पत्नी सारा(Rebecca Hall) च्या सल्ल्याने आपला स्वतःचे जादूचे प्रयोग सुरु करतो,गर्दी खेचण्यासाठी तो जीवघेणी अशी बंदुकीची trick सुरु करतो,त्यात खेळात angier आपला बदला घेतो आणि आल्फ्रेड ची बोटे कापली जातात.निराश Angier कटरच्या मदतीने जादूचे प्रयोग सुरु करतो,ह्या वेळेस आल्फ्रेड आपला बदला घेतो,आणि Angier चे प्रयोग बंद पडतात.पुढे आल्फ्रेड 'the transported man' चा शो सुरु करतो आणि अमाप प्रसिद्धी कमावतो.तीच आईडिया Angier वापरतो आणि आल्फ्रेड मुळे आपला पाय मोडून घेतो.आल्फ्रेड चे सिक्रेट शोधण्या साठी angier ओलीविया(Scarlett Johansson)ला आल्फ्रेडच्या शो मध्ये भाग घेण्यास पाठवतो.
टेसलाच्या मशीनने clones तयार होतात हे angier ला कळत आणि तो त्यांच्या मदतीने 'The real transported man' ची रचना करतो.
.नंतरचा चित्रपट अतिशय सुंदर आणि क्लिष्ट आहे त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्येकानेच तो बघावा असं मला वाटतं.


आल्फ्रेड आणि ओलीविया च नातं,टेसलाची मशीन,FALLON आणि सर्वात महत्वाचा शेवट या सर्व गोष्टी आणि त्यांची मांडणी अप्रतिम आहे.Christian Bale आणि Huge Jackman ह्या दोघांचे काम पाहाण्याजोगे आहे.मात्र Michael Caine आणि Christian Bale चं संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन जातात असं म्हण्यास हरकत नाही ; पण म्हणजे असं नाही कि Huge Jackman चं काम खराब आहे.पण वैयक्तिकरित्या मला त्या दोघांचे काम फार आवडले.


शेवटी
मात्र महत्वाचं असं जोनाथन नोलान आणि ख्रिस्तोफर नोलान यांनी लिहिलेली कथा, ख्रिस्तोफर नोलानचं दिग्दर्शन चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं; आणि त्यामुळेच हा चित्रपट जादूच्या तिसऱ्या भागाप्रमाणे 'The Prestige'मध्ये अचूक आणि अविस्मरणीय ठरतो.


-----
अनिकेत सुरगुडे

2 comments:

 1. Fist of all, nice to see ur blog, inspired from Ganesh matkari's Blog.
  I regularly read your comments on "AAPLA CINEMASCOPE".
  As far as your age is concerned your thinking about films is appreiciale. Keep it up !!!!!
  And try to tell us diffrent types of films.

  ReplyDelete
 2. ख्रिस्तोफर नोलान हा माझासुद्धा आवडता डायरेक्टर . हा चित्रपट खरोखर ONE OF THE BEST & MUST WATCH

  ReplyDelete